AI

ChatGPT वापरून WhatsApp संदेश आणि Share करण्यासाठी Graphic कसे तयार करावे?

ChatGPT वापरून WhatsApp संदेश, निमंत्रण, शुभेच्छा आणि Share करण्यासाठी आकर्षक Graphics कसे तयार करायचे ते सोप्या मराठीत जाणून घ्या.

Social Sanvad१४ मिनिटं वाचा

ChatGPT वापरून WhatsApp संदेश आणि Share करण्यासाठी Graphic कसे तयार करावे?

WhatsApp हा आपल्या रोजच्या वापरातील सर्वात सोपा आणि उपयोगी माध्यमांपैकी एक आहे.

एखाद्याला शुभेच्छा द्यायच्या असतील, कार्यक्रमाची माहिती द्यायची असेल, एखादं निमंत्रण पाठवायचं असेल किंवा एखादी महत्त्वाची सूचना लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर आपण लगेच WhatsApp उघडतो.

पण प्रत्येक वेळी योग्य शब्द सुचतीलच असं नाही.

कधी संदेश खूप मोठा होतो, कधी तो खूप औपचारिक वाटतो, तर कधी आपल्याला जे सांगायचं आहे ते नीट शब्दांत मांडता येत नाही.

अशा वेळी ChatGPT आपला मदतनीस होऊ शकतो.

तुम्ही ChatGPT ला काही माहिती दिली आणि त्याला सांगितलं की त्यावर आधारित WhatsApp संदेश तयार करायचा आहे, तर तो काही सेकंदांत संदेशाचा मसुदा तयार करून देऊ शकतो.

उदाहरणार्थ, तुम्ही फक्त एवढं लिहिलं:

रविवारी रक्तदान शिबिर आहे. त्यासाठी WhatsApp संदेश लिहा.

ChatGPT एक संदेश तयार करेल.

पण तुम्हाला अधिक चांगला आणि तुमच्या गरजेनुसार संदेश हवा असेल, तर थोडी अधिक माहिती द्या.

उदाहरण:

रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत
शिवाजी मैदान, दादर येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
 
या माहितीनुसार WhatsApp वर पाठवण्यासाठी
७० ते ८० शब्दांचा संदेश तयार करा.
 
भाषा: साधी मराठी
टोन: आपुलकीचा आणि प्रेरणादायी
शेवटी नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे
असे आवाहन करा.
Emoji वापरू नका.

दुसऱ्या Prompt मध्ये आपण कार्यक्रमाची तारीख, वेळ, ठिकाण, संदेशाची लांबी, भाषा आणि शैली स्पष्ट सांगितली आहे.

त्यामुळे ChatGPT ला आपल्याला नेमकं काय हवं आहे हे समजणं सोपं होतं.

मागील लेखात आपण चांगला Prompt कसा लिहायचा हे सविस्तर पाहिलं आहे. जर तो लेख वाचला नसेल तर ChatGPT साठी प्रभावी Prompt कसे लिहावे? हा लेख आधी वाचू शकता.

आता WhatsApp साठी वेगवेगळे संदेश ChatGPT कडून कसे तयार करून घ्यायचे ते प्रत्यक्ष उदाहरणांमधून पाहूया.


WhatsApp संदेशासाठी ChatGPT ला काय सांगायचं?

WhatsApp संदेश तयार करताना ChatGPT ला फक्त विषय सांगितला तरी तो संदेश तयार करून देईल.

पण तुम्हाला तुमच्या मनासारखा संदेश हवा असेल तर थोडी अधिक माहिती देणं चांगलं.

उदाहरणार्थ, तुम्हाला वाढदिवसाचा संदेश हवा असेल तर फक्त:

वाढदिवसाचा WhatsApp संदेश लिहा.

असं लिहिण्याऐवजी खालील माहिती दिली तर Result अधिक चांगला मिळू शकतो:

  • कोणासाठी संदेश आहे?
  • कोणत्या कारणासाठी आहे?
  • संदेश किती मोठा हवा?
  • भाषा कशी हवी?
  • Tone कसा हवा?
  • काही गोष्ट विशेषतः सांगायची आहे का?

एक सोपा Formula

WhatsApp संदेशासाठी Prompt लिहिताना हे लक्षात ठेवा:

विषय + कोणासाठी + भाषा + Tone + लांबी + विशेष सूचना

उदाहरण:

माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त WhatsApp वर पाठवण्यासाठी
७० शब्दांचा शुभेच्छा संदेश लिहा.
 
भाषा: साधी मराठी
 
Tone: आपुलकीचा आणि मनापासून
 
संदेशामध्ये त्याच्या उत्तम आरोग्याची,
आनंदाची आणि यशाची शुभेच्छा द्या.
 
Emoji वापरू नका.

यामध्ये ChatGPT ला नेमकं काय करायचं आहे हे स्पष्ट आहे.

आता हा Formula वापरून काही रोजच्या उपयोगातील WhatsApp संदेश तयार करून पाहूया.


१. वाढदिवसासाठी WhatsApp संदेश

वाढदिवसासाठी दरवर्षी एकच संदेश Forward करण्याऐवजी त्या व्यक्तीनुसार थोडा वेगळा संदेश तयार करता येतो.

हा Prompt कॉपी करा

माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त WhatsApp वर पाठवण्यासाठी
७० ते ८० शब्दांचा शुभेच्छा संदेश लिहा.
 
भाषा: साधी आणि आपुलकीची मराठी
 
Tone: मनापासून आणि सकारात्मक
 
संदेशामध्ये उत्तम आरोग्य, आनंद आणि यशासाठी शुभेच्छा द्या.
 
संदेश खूप औपचारिक वाटू नये.
 
Emoji वापरू नका.

यामध्ये "मित्राच्या" ऐवजी तुम्ही भाऊ, बहीण, सहकारी, मित्र, नातेवाईक किंवा एखाद्या विशेष व्यक्तीच्या असं लिहू शकता.

त्याच Prompt मध्ये व्यक्तीबद्दल थोडी माहिती दिली तर संदेश आणखी वैयक्तिक करता येतो.

उदाहरण:

तो गेली १० वर्षे सामाजिक काम करत आहे.
त्याचा उल्लेख संदेशामध्ये नैसर्गिक पद्धतीने करा.

२. कार्यक्रमाचे निमंत्रण

एखादा कार्यक्रम आयोजित केला असेल आणि त्याचं निमंत्रण WhatsApp वर पाठवायचं असेल तर ChatGPT कडून व्यवस्थित संदेश तयार करून घेता येतो.

हा Prompt कॉपी करा

खालील माहितीच्या आधारे WhatsApp वर पाठवण्यासाठी
एक साधं आणि आकर्षक कार्यक्रमाचं निमंत्रण तयार करा.
 
कार्यक्रम: आरोग्य तपासणी शिबिर
 
तारीख: २५ ऑगस्ट
 
वेळ: सकाळी ९ ते दुपारी २
 
ठिकाण: श्री गणेश मंदिर सभागृह
 
भाषा: साधी मराठी
 
Tone: आपुलकीचा
 
संदेश १०० शब्दांपेक्षा मोठा नसावा.
 
शेवटी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं
असं आवाहन करा.
 
Emoji वापरू नका.

इथे तुम्हाला फक्त कार्यक्रमाची खरी माहिती बदलायची आहे.

उदाहरणार्थ:

कार्यक्रमाचे नाव, तारीख, वेळ, ठिकाण, प्रमुख पाहुणे आणि संपर्क क्रमांक तुम्ही तुमच्या कार्यक्रमानुसार बदलू शकता.

अशा प्रकारे एकच Prompt वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी पुन्हा वापरता येतो.


३. कार्यक्रमाची आठवण करून देणारा WhatsApp संदेश

कधी कधी कार्यक्रमाचं निमंत्रण आधीच पाठवलेलं असतं. पण कार्यक्रमाच्या एक दिवस आधी किंवा काही तास आधी लोकांना पुन्हा आठवण करून द्यायची असते.

अशा वेळी खूप मोठा संदेश पाठवण्यापेक्षा छोटा आणि स्पष्ट Reminder चांगला वाटतो.

हा Prompt कॉपी करा

उद्या होणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराची आठवण करून देण्यासाठी
WhatsApp वर पाठवता येईल असा छोटा संदेश लिहा.
 
कार्यक्रम: आरोग्य तपासणी शिबिर
 
तारीख: २५ ऑगस्ट
 
वेळ: सकाळी ९ ते दुपारी २
 
ठिकाण: श्री गणेश मंदिर सभागृह
 
भाषा: साधी मराठी
 
Tone: आपुलकीचा आणि नम्र
 
संदेश ५० शब्दांपेक्षा मोठा नसावा.
 
शेवटी वेळेवर उपस्थित राहण्याची विनंती करा.

या प्रकारचा Prompt तुम्ही सभा, बैठका, शिबिरे, कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही आयोजनासाठी वापरू शकता.


४. अभिनंदनाचा WhatsApp संदेश

एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला, परीक्षेत यश मिळालं, नवीन जबाबदारी मिळाली किंवा एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झालं असेल तर WhatsApp वर अभिनंदन करण्यासाठी ChatGPT चा उपयोग करता येतो.

हा Prompt कॉपी करा

एका व्यक्तीला मिळालेल्या महत्त्वपूर्ण यशाबद्दल
WhatsApp वर पाठवण्यासाठी ६० ते ७० शब्दांचा
अभिनंदन संदेश लिहा.
 
यश: राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
 
भाषा: साधी मराठी
 
Tone: मनापासून आणि आपुलकीचा
 
त्यांच्या मेहनतीचं आणि यशाचं कौतुक करा.
 
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्या.
 
संदेश खूप औपचारिक वाटू नये.

इथे "यश" ही माहिती बदलून तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगांसाठी संदेश तयार करू शकता.

उदाहरणार्थ:

  • परीक्षेत यश
  • पुरस्कार
  • नवीन पदाची जबाबदारी
  • स्पर्धेतील विजय
  • व्यवसायातील यश
  • सामाजिक कार्यातील गौरव

५. आभार मानण्यासाठी WhatsApp संदेश

एखादा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर सहभागी झालेल्या लोकांचे किंवा मदत करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्यासाठी WhatsApp संदेश पाठवायचा असेल तर ChatGPT त्याचा मसुदा तयार करू शकतो.

हा Prompt कॉपी करा

काल झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या
सर्व नागरिकांचे आभार मानण्यासाठी WhatsApp संदेश लिहा.
 
कार्यक्रम: रक्तदान शिबिर
 
संदेश ७० शब्दांचा असावा.
 
भाषा: साधी मराठी
 
Tone: मनापासून आणि आपुलकीचा
 
कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या नागरिकांचे,
स्वयंसेवकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे
आभार माना.
 
संदेश औपचारिक न वाटता मनापासून वाटला पाहिजे.

अशा प्रकारचा संदेश कार्यक्रमानंतर लगेच पाठवता येतो.

विशेषतः मोठ्या कार्यक्रमानंतर प्रत्येकासाठी स्वतंत्र संदेश लिहिण्याची गरज नसल्यामुळे वेळही वाचतो.


६. एखादी माहिती सोप्या भाषेत सांगणारा संदेश

WhatsApp वर एखादी माहिती पाठवताना ती खूप मोठी किंवा अवघड असेल तर लोक ती पूर्ण वाचतीलच असं नाही.

ChatGPT कडून तीच माहिती लहान, स्पष्ट आणि सोप्या भाषेत करून घेता येते.

हा Prompt कॉपी करा

खाली दिलेली माहिती WhatsApp वर पाठवण्यासाठी
सोप्या आणि स्पष्ट मराठीत पुन्हा लिहा.
 
मूळ माहिती:
 
"उद्या सकाळी १० वाजता परिसरातील पाणीपुरवठ्याच्या
कामासंदर्भात नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
संबंधित नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना
मांडाव्यात."
 
संदेश ५० शब्दांपेक्षा मोठा नसावा.
 
महत्त्वाची माहिती कायम ठेवा.
 
भाषा अगदी सोपी ठेवा.
 
Emoji वापरू नका.

याचा उपयोग फक्त WhatsApp साठीच नाही तर मोठा मजकूर छोटा करून Status किंवा Social Media Post तयार करण्यासाठीही करता येतो.


एक महत्त्वाची टिप

WhatsApp संदेश तयार करताना ChatGPT ला संपूर्ण माहिती देणं महत्त्वाचं आहे.

उदाहरणार्थ, कार्यक्रमाचा संदेश तयार करत असाल तर:

तारीख + वेळ + ठिकाण + कार्यक्रम + कोणासाठी + काय करायचं आहे

ही माहिती Prompt मध्ये द्या.

मग ChatGPT ला अंदाज लावावा लागणार नाही.

आणि तयार झालेला संदेश पाठवण्यापूर्वी एकदा नक्की वाचा.

विशेषतः नाव, तारीख, वेळ, ठिकाण आणि फोन नंबर बरोबर आहेत का हे तपासा.


एकाच माहितीचे वेगवेगळे WhatsApp संदेश तयार करा

समजा तुमच्याकडे एखाद्या कार्यक्रमाची माहिती आहे.

आता त्याच माहितीवरून तुम्हाला वेगवेगळ्या लोकांसाठी किंवा वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळे संदेश तयार करायचे आहेत.

प्रत्येक वेळी नवीन संदेश स्वतः लिहिण्याची गरज नाही.

ChatGPT ला एकाच माहितीवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे संदेश तयार करायला सांगता येतात.

उदाहरणार्थ, तुम्ही ChatGPT ला सांगू शकता:

खाली दिलेल्या कार्यक्रमाच्या माहितीवर आधारित
WhatsApp साठी ३ वेगवेगळे संदेश तयार करा.
 
कार्यक्रम: नागरिक आरोग्य तपासणी शिबिर
 
तारीख: २५ ऑगस्ट
 
वेळ: सकाळी ९ ते दुपारी २
 
ठिकाण: श्री गणेश मंदिर सभागृह
 
पहिला संदेश:
अतिशय छोटा आणि थेट असावा.
 
दुसरा संदेश:
आपुलकीचा आणि थोडा सविस्तर असावा.
 
तिसरा संदेश:
लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं यासाठी
प्रेरणादायी असावा.
 
भाषा: साधी मराठी
 
Emoji वापरू नका.

अशा प्रकारे एकाच माहितीचे तीन वेगळे पर्याय काही सेकंदांत मिळू शकतात.


Short Message हवा असेल तर

कधी कधी WhatsApp वर खूप मोठा संदेश पाठवण्यापेक्षा दोन-तीन ओळींचा संदेश जास्त प्रभावी ठरतो.

हा Prompt कॉपी करा

खालील माहितीवर आधारित WhatsApp साठी
फक्त ३० ते ४० शब्दांचा छोटा संदेश लिहा.
 
कार्यक्रम: रक्तदान शिबिर
 
तारीख: २५ ऑगस्ट
 
वेळ: सकाळी ९ ते दुपारी २
 
ठिकाण: शिवाजी मैदान
 
भाषा: साधी मराठी
 
महत्त्वाची माहिती कायम ठेवा.
 
संदेश थेट आणि स्पष्ट असावा.

याचा उपयोग Status, Broadcast किंवा वैयक्तिक WhatsApp संदेशासाठी करता येतो.


अधिक आपुलकीचा संदेश हवा असेल तर

एकाच माहितीचा संदेश अधिक आपुलकीचा आणि वैयक्तिक वाटावा असंही सांगता येतं.

हा Prompt कॉपी करा

खालील कार्यक्रमासाठी WhatsApp संदेश लिहा.
 
कार्यक्रम: नागरिक संवाद बैठक
 
तारीख: २८ ऑगस्ट
 
वेळ: संध्याकाळी ६ वाजता
 
ठिकाण: समाजमंदिर सभागृह
 
हा संदेश औपचारिक वाटू नये.
 
तो एखाद्या परिचित व्यक्तीने आपल्या लोकांना
आपुलकीने बोलावल्यासारखा वाटावा.
 
भाषा: अगदी सोपी मराठी
 
लांबी: ७० ते ८० शब्द
 
शेवटी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं
असं नमूद करा.

"आपुलकीचा", "साधा", "मनापासून", "थेट" असे शब्द Prompt मध्ये वापरल्याने ChatGPT ला तुम्हाला कोणत्या प्रकारची भाषा हवी आहे हे समजायला मदत होते.


एकाच संदेशाचे Facebook आणि WhatsApp Version तयार करा

कधी कधी एकच माहिती Facebook, WhatsApp आणि Instagram या तिन्ही ठिकाणी वापरायची असते.

पण प्रत्येक माध्यमासाठी तोच मजकूर वापरणं आवश्यक नाही.

ChatGPT ला एकाच वेळी वेगवेगळे Version तयार करायला सांगता येतात.

हा Prompt कॉपी करा

खालील कार्यक्रमाची माहिती वापरून तीन वेगवेगळे मजकूर तयार करा.
 
कार्यक्रम: वृक्षारोपण कार्यक्रम
 
तारीख: ३० ऑगस्ट
 
वेळ: सकाळी ८ वाजता
 
ठिकाण: स्थानिक उद्यान
 
१. WhatsApp साठी:
५० शब्दांचा छोटा आणि स्पष्ट संदेश.
 
२. Facebook साठी:
१०० शब्दांची थोडी सविस्तर पोस्ट.
 
३. Instagram साठी:
३० ते ४० शब्दांचं आकर्षक Caption.
 
भाषा: साधी मराठी
 
प्रत्येक माध्यमासाठी भाषा आणि शैली
त्या माध्यमाला योग्य अशी ठेवा.
 
Emoji वापरू नका.

यामुळे एकाच माहितीवरून तीन वेगवेगळे मजकूर तयार करण्याचं काम काही सेकंदांत होऊ शकतं.


आता पुढचं पाऊल — Text ऐवजी Graphic

WhatsApp वर फक्त Text Message पाठवण्यापेक्षा काही माहिती Graphic किंवा Poster स्वरूपात पाठवली तर ती अधिक लक्ष वेधून घेऊ शकते.

उदाहरणार्थ:

  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • कार्यक्रमाचे निमंत्रण
  • एखादी महत्त्वाची सूचना
  • सामाजिक उपक्रम
  • अभिनंदन
  • सणाच्या शुभेच्छा

अशा वेळी आपण ChatGPT कडून आधी संदेश तयार करून घेऊ शकतो आणि त्याच माहितीवर आधारित WhatsApp Share Graphic तयार करण्यासाठी Image Prompt देखील मागू शकतो.

पुढे ते कसं करायचं ते पाहूया.


WhatsApp वर Share करण्यासाठी Graphic कसा तयार करायचा?

WhatsApp वर माहिती पाठवताना नेहमी फक्त Text Message वापरण्याची गरज नाही.

काही माहिती Graphic किंवा Poster स्वरूपात दिली तर ती पाहणाऱ्याचं लक्ष पटकन वेधून घेऊ शकते.

उदाहरणार्थ:

  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • कार्यक्रमाचं निमंत्रण
  • एखादी महत्त्वाची सूचना
  • सामाजिक उपक्रम
  • अभिनंदन
  • सणाच्या शुभेच्छा
  • एखाद्या कार्यक्रमाची आठवण

अशा गोष्टींसाठी तुम्ही ChatGPT च्या मदतीने AI Image किंवा Poster तयार करू शकता.

पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

Text Message साठी आपण ChatGPT ला काय लिहायचं आहे हे सांगतो.

Graphic साठी मात्र आपण काय दिसायला हवं हे सांगतो.

म्हणून Image तयार करताना Prompt थोडा वेगळा असतो.


Image Prompt मध्ये काय सांगायचं?

AI ला Graphic तयार करायला सांगताना तुम्ही खालील गोष्टी स्पष्ट करू शकता:

विषय: Graphic कशासाठी आहे?

मुख्य व्यक्ती किंवा वस्तू: कोणाचा फोटो किंवा कोणता विषय दाखवायचा आहे?

Background: पार्श्वभूमी कशी हवी?

रंग: कोणते रंग वापरायचे?

Style: साधा, Premium, Modern, Cinematic किंवा Traditional?

Text: Graphic वर कोणता मजकूर हवा?

Text ची जागा: मजकूर कुठे असावा?

Aspect Ratio: Graphic कोणत्या आकारात हवा?

उदाहरणार्थ, WhatsApp वर Share करण्यासाठी 1:1 किंवा 4:5 असा आकार वापरता येतो.


१. वाढदिवसासाठी WhatsApp Graphic

समजा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस आहे आणि त्यांचा फोटो वापरून WhatsApp वर Share करता येईल असा Graphic तयार करायचा आहे.

हा Prompt कॉपी करा

Create a premium birthday social media graphic using the uploaded portrait photo.
 
Keep the person's face natural and recognizable.
 
Style:
Elegant
Premium
Modern
Clean
 
Background:
Dark cinematic background with subtle golden light effects.
 
Composition:
Place the person's portrait prominently on one side.
Keep clean space for Marathi text on the other side.
 
Add Marathi text:
 
"वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा"
 
Keep the design uncluttered.
 
Leave space below the main heading for the person's name.
 
Aspect Ratio: 1:1
 
High Resolution.
No watermark.

हा Graphic WhatsApp वर थेट Share करता येईल.

तुम्हाला WhatsApp Status साठी Graphic हवा असेल तर त्याच Prompt मध्ये:

Aspect Ratio: 9:16

असं बदलू शकता.


२. कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी Graphic

कार्यक्रमाचं निमंत्रण फक्त Text मध्ये पाठवण्याऐवजी त्याच माहितीचा एक सुंदर Graphic तयार करून Share करता येतो.

हा Prompt कॉपी करा

Create a clean and attractive WhatsApp event invitation graphic.
 
Event:
Health Check-up Camp
 
Date:
25 August
 
Time:
9 AM to 2 PM
 
Location:
Shri Ganesh Mandir Hall
 
Style:
Clean
Modern
Professional
Friendly
 
Background:
Bright and welcoming healthcare-themed background with subtle medical visual elements.
 
Composition:
Keep the event title prominent at the top.
Leave clearly separated spaces for date, time and location.
 
Add Marathi typography for the main heading:
 
"आरोग्य तपासणी शिबिर"
 
Keep the design easy to read on a mobile phone.
 
Do not overcrowd the design.
 
Aspect Ratio: 1:1
 
High Resolution.
No watermark.

इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे.

AI ने तयार केलेल्या Image मध्ये Marathi Text कधी कधी चुकीचा येऊ शकतो.

म्हणून Graphic ची visual design AI कडून तयार करून घेऊन, अंतिम Marathi Text Canva सारख्या Design Tool मध्ये स्वतः टाकणं अनेकदा अधिक चांगला पर्याय ठरतो.

यामुळे नाव, तारीख, वेळ आणि ठिकाण यामध्ये चूक होण्याची शक्यता कमी होते.


३. सामाजिक उपक्रमासाठी Share Graphic

रक्तदान, वृक्षारोपण किंवा स्वच्छता अभियानासारख्या उपक्रमांची माहिती WhatsApp वर Share करण्यासाठी Graphic तयार करता येतो.

हा Prompt कॉपी करा

Create a modern social awareness graphic for a community tree plantation activity.
 
Scene:
A group of local citizens planting trees together.
 
Style:
Natural
Positive
Realistic
Clean
Professional
 
Background:
Green outdoor environment with trees and soft natural sunlight.
 
Composition:
Show people planting trees naturally.
Leave clean negative space for Marathi text.
 
Main Marathi heading:
 
"चला, झाडे लावूया!"
 
Keep the design suitable for WhatsApp sharing.
 
Use a fresh and positive visual mood.
 
Aspect Ratio: 1:1
 
High Resolution.
No watermark.

इथे तुम्ही "वृक्षारोपण" ऐवजी इतर उपक्रम टाकू शकता.

उदाहरणार्थ:

  • रक्तदान
  • स्वच्छता अभियान
  • आरोग्य शिबिर
  • पुस्तक वाटप
  • शैक्षणिक उपक्रम

फक्त विषय बदलून नवीन Graphic तयार करता येतो.


Graphic तयार करताना एक महत्त्वाची टिप

AI कडून Graphic तयार करून घेताना सगळा मजकूर Image मध्येच टाकण्याचा आग्रह करू नका.

विशेषतः खालील माहिती स्वतः नंतर Design मध्ये टाकणं अधिक सुरक्षित आहे:

  • व्यक्तीचं नाव
  • तारीख
  • वेळ
  • ठिकाण
  • फोन नंबर
  • वेबसाइट
  • कार्यक्रमाची इतर माहिती

AI कडून तुम्ही Background, Composition, Visual आणि Design Style तयार करून घेऊ शकता.

त्यानंतर Canva किंवा इतर Design Tool मध्ये अचूक मजकूर टाकू शकता.

यामुळे Graphic अधिक व्यवस्थित आणि विश्वासार्ह दिसतो.


Text Message + Graphic = अधिक प्रभावी Share

एकाच माहितीचे दोन भाग करता येतात.

पहिला: छोटा WhatsApp Text Message

दुसरा: त्याच माहितीवर आधारित Graphic

उदाहरणार्थ:

Text:

"२५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं."

आणि त्यासोबत:

आरोग्य तपासणी शिबिर
२५ ऑगस्ट | सकाळी ९ ते दुपारी २
श्री गणेश मंदिर सभागृह

असा Graphic.

म्हणजे समोरच्या व्यक्तीला माहिती वाचताही येते आणि पाहताही येते.

आता आपण ChatGPT ला एकाच वेळी WhatsApp Message आणि त्यासाठीचा Image Prompt कसा तयार करून द्यायचा ते पाहूया.


एकाच वेळी WhatsApp Message आणि Graphic तयार करून घ्या

आत्तापर्यंत आपण दोन गोष्टी वेगवेगळ्या पाहिल्या:

WhatsApp साठी Text Message

आणि

WhatsApp वर Share करण्यासाठी Graphic

पण प्रत्यक्ष काम करताना या दोन्ही गोष्टी एकाच वेळी तयार करून घेणं अधिक सोयीचं ठरू शकतं.

तुम्ही ChatGPT ला कार्यक्रमाची माहिती एकदाच द्या आणि त्याला सांगा की:

  1. WhatsApp वर पाठवण्यासाठी छोटा संदेश तयार करा.
  2. त्याच माहितीसाठी Share करण्यायोग्य Graphic तयार करण्याचा Image Prompt द्या.

उदाहरण पाहूया.

हा Prompt कॉपी करा

खाली दिलेल्या कार्यक्रमाच्या माहितीवर आधारित मला दोन गोष्टी तयार करून द्या.
 
कार्यक्रम:
रक्तदान शिबिर
 
तारीख:
२५ ऑगस्ट
 
वेळ:
सकाळी ९ ते दुपारी २
 
ठिकाण:
शिवाजी मैदान
 
पहिलं:
WhatsApp वर पाठवण्यासाठी ५० ते ६० शब्दांचा
सोप्या मराठीत संदेश लिहा.
 
Tone:
आपुलकीचा आणि प्रेरणादायी
 
शेवटी नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे
असं आवाहन करा.
 
दुसरं:
याच माहितीवर आधारित WhatsApp वर Share करता येईल
असा 1:1 Social Media Graphic तयार करण्यासाठी
एक सविस्तर Image Prompt लिहा.
 
Graphic Style:
Clean
Modern
Positive
Professional
 
Graphic मध्ये रक्तदानाशी संबंधित योग्य Visual Elements असावेत.
 
मुख्य Heading:
"रक्तदान शिबिर"
 
तारीख, वेळ आणि ठिकाणासाठी स्पष्ट जागा ठेवा.
 
Graphic Mobile Screen वर सहज वाचता येईल असा असावा.
 
Image Prompt इंग्रजीमध्ये द्या.

अशा प्रकारे तुम्हाला एकाच उत्तरामध्ये WhatsApp Message आणि Image Prompt दोन्ही मिळतील.


एकाच माहितीचे तीन प्रकार तयार करून घ्या

तुम्हाला काम आणखी सोपं करायचं असेल तर ChatGPT ला एकाच माहितीवर आधारित तीन वेगवेगळे प्रकार तयार करायला सांगू शकता.

उदाहरण:

खालील कार्यक्रमाच्या माहितीवर आधारित चार गोष्टी तयार करा.
 
कार्यक्रम:
नागरिक संवाद बैठक
 
तारीख:
२८ ऑगस्ट
 
वेळ:
संध्याकाळी ६ वाजता
 
ठिकाण:
समाजमंदिर सभागृह
 
१. WhatsApp साठी:
५० शब्दांचा छोटा संदेश.
 
२. WhatsApp Status साठी:
३० शब्दांचा छोटा मजकूर.
 
३. Facebook साठी:
१०० शब्दांची पोस्ट.
 
४. WhatsApp Share Graphic साठी:
1:1 AI Image तयार करण्याचा सविस्तर Image Prompt.
 
सर्व मजकूर साध्या मराठीत असावा.
 
Image Prompt इंग्रजीमध्ये द्या.
 
सर्व माहिती अचूक ठेवा.

यामुळे एका कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येईल असा Content एकाच वेळी तयार होतो.


ChatGPT ला माहिती एकदाच द्या

या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकच माहिती पुन्हा पुन्हा लिहावी लागत नाही.

उदाहरणार्थ, तुमच्याकडे एखाद्या कार्यक्रमाची माहिती तयार आहे.

ती एकदाच ChatGPT ला द्या.

नंतर सांगा:

याच माहितीवर Instagram Caption तयार करा.

किंवा:

याच माहितीवर WhatsApp Status तयार करा.

किंवा:

याच माहितीवर Share करण्यासाठी 1:1 Graphic चा Image Prompt तयार करा.

किंवा:

याच माहितीचा ५० शब्दांचा छोटा WhatsApp संदेश तयार करा.

ChatGPT तुमच्या आधी दिलेल्या माहितीचा संदर्भ घेऊन नवीन Content तयार करू शकतो.


पण तयार झालेला Content पाठवण्याआधी तपासा

AI ने तयार केलेला संदेश किंवा Graphic थेट Share करण्यापूर्वी एकदा स्वतः तपासणं महत्त्वाचं आहे.

विशेषतः:

  • व्यक्तीचं नाव
  • कार्यक्रमाचं नाव
  • तारीख
  • वेळ
  • ठिकाण
  • संपर्क क्रमांक
  • वेबसाइट किंवा लिंक

यापैकी कोणतीही माहिती चुकीची असल्यास ती दुरुस्त करा.

AI तुमचं काम सोपं करतं, पण माहिती खरी आणि अचूक आहे याची जबाबदारी तुमचीच आहे.


आता तुम्ही स्वतःचा WhatsApp Content तयार करू शकता

आता तुमच्याकडे एक सोपी पद्धत आहे:

माहिती द्या

WhatsApp Message तयार करा

त्याच माहितीचा Graphic तयार करा

मजकूर आणि माहिती तपासा

WhatsApp वर Share करा

ही पद्धत एकदा समजली की रोजच्या अनेक कामांसाठी ChatGPT चा उपयोग करता येतो.

पुढे आपण पाहूया की AI ने तयार केलेल्या Graphic मध्ये Marathi Text चुकीचा आला तर काय करायचं आणि Graphic अधिक चांगला कसा बनवायचा.


AI ने तयार केलेल्या Graphic मध्ये चूक झाली तर काय करायचं?

AI ने तयार केलेला Graphic पहिल्याच प्रयत्नात अगदी आपल्या मनासारखा तयार होईलच असं नाही.

कधी Marathi Text चुकीचा येतो, कधी नाव चुकीचं दिसतं, कधी अक्षरांची मांडणी बिघडते, तर कधी Background मध्ये खूप जास्त गोष्टी दिसतात.

अशावेळी लगेच नवीन Prompt लिहिण्याची गरज नाही.

पहिल्या Result मध्ये काय चुकलं आहे ते पाहा आणि ChatGPT ला नेमका बदल सांगितला तर तो पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो.

उदाहरणार्थ, Graphic मध्ये Text चुकीचा आला असेल तर:

Marathi text चुकीचा दिसत आहे.
 
Text पुन्हा स्पष्ट आणि योग्य मराठीमध्ये द्या.
 
मुख्य Heading:
"रक्तदान शिबिर"
 
इतर कोणताही मजकूर बदलू नका.
 
Design आणि Background तसेच ठेवा.

किंवा Design खूप गर्दीचा वाटत असेल तर:

Design अधिक clean आणि minimal करा.
 
Background मधील अनावश्यक elements काढा.
 
मुख्य व्यक्ती आणि Heading वर लक्ष केंद्रित करा.
 
Text साठी अधिक negative space ठेवा.

यामुळे प्रत्येक वेळी सुरुवातीपासून पूर्ण Prompt लिहिण्याची गरज पडत नाही.


Marathi Text साठी एक महत्त्वाची टिप

AI Image Tools मध्ये मराठी किंवा इतर भारतीय भाषेतील Text कधी कधी चुकीचा तयार होऊ शकतो.

विशेषतः:

  • व्यक्तींची नावं
  • ठिकाणांची नावं
  • लांब वाक्य
  • फोन नंबर
  • तारीख
  • कार्यक्रमाची माहिती

या गोष्टी Image मध्ये थेट AI कडून लिहून घेण्यापेक्षा Graphic चा Visual AI कडून तयार करून घेणं आणि अंतिम Text Canva किंवा इतर Design Tool मध्ये स्वतः टाकणं अधिक चांगलं ठरू शकतं.

उदाहरणार्थ, AI ला असं सांगता येईल:

Create the complete visual design but do not add any text.
 
Leave clean negative space for Marathi typography.
 
The text will be added later in a design tool.

यामुळे AI चं काम मुख्यतः Background, Visual आणि Composition तयार करण्यापुरतं राहतं.

नंतर तुम्ही स्वतः अचूक मराठी मजकूर टाकू शकता.


व्यक्तीचा फोटो वापरताना काय सांगायचं?

जर एखाद्या व्यक्तीचा फोटो वापरून Graphic तयार करत असाल तर Prompt मध्ये हे स्पष्ट करणं उपयोगी ठरतं:

Use the uploaded portrait photo as the main reference.
 
Keep the person's face natural and recognizable.
 
Do not change facial features.
 
Do not change the person's identity.
 
Keep the overall appearance realistic.

यामुळे AI ला फोटोमध्ये अनावश्यक बदल न करण्याची सूचना मिळते.

तुम्हाला व्यक्तीचा फोटो अगदी तसाच ठेवायचा असेल तर हेही लिहू शकता:

Preserve the original facial features and natural appearance of the person.

Graphic तयार झाल्यावर शेवटची तपासणी

Graphic Share करण्यापूर्वी फक्त Design चांगलं दिसतंय का हे पाहू नका.

खालील माहितीही तपासा:

१. नाव बरोबर आहे का?

२. तारीख बरोबर आहे का?

३. वेळ बरोबर आहे का?

४. ठिकाण बरोबर आहे का?

५. फोन नंबर किंवा Link बरोबर आहे का?

६. Marathi Text मध्ये spelling चूक नाही ना?

७. Graphic Mobile वर सहज वाचता येतोय का?

ही छोटी तपासणी खूप महत्त्वाची आहे.

कारण सुंदर Graphic असूनही त्यात चुकीची तारीख किंवा फोन नंबर असेल तर त्याचा उपयोग होणार नाही.


WhatsApp साठी Graphic किती मोठा असावा?

Graphic तयार करताना तो कुठे वापरणार आहात हे आधी ठरवा.

WhatsApp वर सामान्य Share साठी

Aspect Ratio: 1:1

हा आकार WhatsApp वर Share करण्यासाठी सोपा आहे.

WhatsApp Status साठी

Aspect Ratio: 9:16

हा पूर्ण Mobile Screen साठी योग्य आहे.

Instagram किंवा Facebook Post साठी

Aspect Ratio: 4:5

हा Social Media Feed मध्ये अधिक जागा व्यापतो.

म्हणून Prompt मध्ये सुरुवातीलाच योग्य Aspect Ratio सांगणं चांगलं.

उदाहरण:

Aspect Ratio: 1:1

किंवा:

Aspect Ratio: 9:16

किंवा:

Aspect Ratio: 4:5

एक सोपी पद्धत लक्षात ठेवा

WhatsApp साठी Content तयार करताना ही प्रक्रिया वापरा:

१. माहिती तयार करा

कार्यक्रम, तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर माहिती.

२. ChatGPT कडून Text Message तयार करून घ्या

भाषा, Tone आणि लांबी सांगा.

३. त्याच माहितीचा Image Prompt तयार करून घ्या

Background, Style, Visual आणि Aspect Ratio सांगा.

४. AI कडून Graphic तयार करा

गरज असल्यास तुमचा फोटो Upload करा.

५. अंतिम Marathi Text स्वतः तपासा

गरज असल्यास Canva मध्ये अचूक Text टाका.

६. Mobile वर एकदा पाहा

मजकूर स्पष्ट दिसतोय का ते तपासा.

७. मग WhatsApp वर Share करा.

AI मुळे ही संपूर्ण प्रक्रिया जलद होते, पण अंतिम निर्णय आणि तपासणी तुमचीच असते.


AI म्हणजे तुमच्या कामाचा पर्याय नाही

ChatGPT तुमच्यासाठी संदेश लिहू शकतो.

AI Image Tool तुमच्यासाठी Graphic तयार करू शकतो.

पण काय सांगायचं, कोणाला सांगायचं आणि कोणत्या पद्धतीने सांगायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे.

म्हणून AI कडे सगळं काम सोपवण्यापेक्षा त्याचा वापर तुमचा वेळ वाचवण्यासाठी आणि तुमचं काम अधिक चांगलं करण्यासाठी करा.

आता तुम्हाला WhatsApp साठी Text Message आणि Share करण्यासाठी Graphic दोन्ही तयार करण्याची मूलभूत पद्धत समजली आहे.


ChatGPT बद्दल आणखी शिकायचं असेल तर

आता आपण पाहिलं की ChatGPT च्या मदतीने WhatsApp साठी संदेश कसा तयार करता येतो आणि त्याच माहितीवर आधारित Share करण्यासाठी Graphic कसा तयार करता येतो.

पण या सगळ्याची सुरुवात एका महत्त्वाच्या गोष्टीपासून होते:

योग्य Prompt लिहिणं.

जर तुम्हाला ChatGPT ला योग्य सूचना कशा द्यायच्या, Prompt मध्ये कोणती माहिती द्यायची आणि चांगला Result मिळवण्यासाठी Prompt कसा सुधारायचा हे अधिक सविस्तर शिकायचं असेल, तर आमचा मागील लेख नक्की वाचा:

ChatGPT साठी प्रभावी Prompt कसे लिहावे? 15 सोप्या उदाहरणांसह

या लेखातील पद्धत समजली की तुम्ही फक्त WhatsApp संदेशच नाही, तर Facebook Post, Social Media Caption आणि AI Images साठीही स्वतःचे Prompt तयार करू शकता.


WhatsApp साठी एक छोटी Checklist

ChatGPT कडून WhatsApp Content तयार करून घेताना ही छोटी Checklist लक्षात ठेवा:

  • काय सांगायचं आहे?
  • कोणाला सांगायचं आहे?
  • संदेश किती मोठा हवा?
  • भाषा कशी हवी?
  • Tone कसा हवा?
  • तारीख, वेळ आणि ठिकाण दिलं आहे का?
  • Graphic हवा असल्यास योग्य Aspect Ratio सांगितलं आहे का?
  • तयार झालेला मजकूर तपासला आहे का?
  • Graphic Mobile वर स्पष्ट दिसतोय का?

ही माहिती दिली की ChatGPT सोबत काम करणं खूप सोपं होऊ शकतं.


आणखी Practical AI Prompts हवेत?

या लेखात आपण काही उदाहरणं पाहिली.

पण रोजच्या कामासाठी प्रत्येक वेळी नवीन Prompt स्वतः तयार करणं आवश्यक नाही.

तुमच्याकडे तयार Prompt चा संग्रह असेल तर काम आणखी सोपं होतं.

यासाठी आम्ही तयार केली आहे:

कार्यकर्त्याची AI डायरी

200+ Practical मराठी AI Prompts असलेली ही ई-बुक रोजच्या Social Media आणि Digital कामात AI चा उपयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी तयार केली आहे.

यामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी तयार Prompt दिले आहेत, जे तुम्ही Copy करून तुमच्या गरजेनुसार बदलू शकता.

उदा.:

  • Social Media Content
  • WhatsApp Messages
  • शुभेच्छा संदेश
  • Facebook Posts
  • AI Image Prompts
  • Posters
  • Content Ideas
  • आणि इतर रोजच्या कामांसाठी AI चा वापर

ई-बुकची किंमत: ₹125

**कार्यकर्त्याची AI डायरी पहा आणि खरेदी करा →**

AI वापरण्यासाठी तुम्हाला Technical Expert असण्याची गरज नाही.

फक्त योग्य प्रश्न विचारायला आणि योग्य Prompt लिहायला सुरुवात करा.

AI कडून काम करून घेण्याची सवय लावा — आणि तुमचा रोजचा Digital कामाचा वेळ वाचवा.

अजून हे वाचा

आठवड्यातून एक छोटी टिप

कामाची गोष्ट — थेट तुमच्या WhatsApp वर.

WhatsApp वर जोडा

बटण दाबा → मेसेज पाठवा → अपडेट्स मिळवा

WhatsApp