ChatGPT उघडलं, प्रश्न विचारला... पण उत्तर आपल्या मनासारखं आलं नाही?
कधी उत्तर खूप मोठं असतं, कधी भाषा अवघड असते, तर कधी आपल्याला हवं असतं काहीतरी वेगळंच आणि ChatGPT काहीतरी वेगळं तयार करतं.
असं का होतं?
अनेकदा समस्या ChatGPT मध्ये नसते. आपण त्याला काय सांगतो यात असते.
ChatGPT ला दिलेल्या सूचनेला Prompt म्हणतात.
चांगला Prompt लिहिता आला, तर ChatGPT कडून आपल्या गरजेनुसार उत्तर मिळवणं खूप सोपं होतं.
या लेखात आपण Prompt म्हणजे काय, तो कसा लिहायचा, ChatGPT प्रभावीपणे कसा वापरायचा (how to use ChatGPT effectively) आणि रोजच्या वापरातील 15 सोपी उदाहरणे पाहणार आहोत.
यातील काही Prompt मजकूर तयार करण्यासाठी आहेत, तर काही AI Image, style prompts आणि सोशल मीडिया पोस्टर तयार करण्यासाठी आहेत.
जर तुम्ही ChatGPT बद्दल अगदी सुरुवातीपासून माहिती घेत असाल, तर आधी ChatGPT म्हणजे काय? हा आमचा लेख वाचा.
Prompt म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर...
Prompt म्हणजे ChatGPT ला दिलेली सूचना.
तुम्हाला ChatGPT कडून जे काम करून घ्यायचं आहे, ते तुम्ही त्याला सांगता. त्या सूचनेच्या आधारे ChatGPT उत्तर किंवा Result तयार करतो.
उदाहरणार्थ, तुम्ही फक्त एवढं लिहिलं:
Facebook पोस्ट लिहा.ChatGPT पोस्ट लिहून देईल.
पण तुम्हाला नेमकी कोणती पोस्ट हवी आहे, ती किती मोठी हवी आहे किंवा तिची भाषा कशी असावी हे त्याला माहीत नाही.
त्याऐवजी तुम्ही असं लिहिलं:
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त Facebook साठी
८० ते १०० शब्दांची पोस्ट लिहा.
भाषा: साधी आणि शुद्ध मराठी
टोन: प्रेरणादायी
Emoji वापरू नका.
शेवटी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्या.आता ChatGPT ला तुमची गरज अधिक स्पष्टपणे समजते.
म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा:
ChatGPT ला जेवढं स्पष्ट सांगाल, तेवढा Result तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळण्याची शक्यता वाढते.
चांगला Prompt लिहिण्यासाठी काय सांगायचं?
Prompt लिहिताना तुम्हाला कोणतेही मोठे किंवा technical शब्द वापरण्याची गरज नाही.
फक्त काही साध्या गोष्टी स्पष्ट करा.
१. काय तयार करायचं?
सर्वात आधी ChatGPT ला सांगा की तुम्हाला नेमकं काय हवं आहे.
उदाहरण:
- Facebook पोस्ट
- WhatsApp संदेश
- भाषण
- निमंत्रण
- Instagram Caption
- Poster
- AI Image
उदाहरणार्थ:
Facebook साठी एक पोस्ट लिहा.किंवा:
Instagram साठी एक आकर्षक Poster तयार करा.२. विषय काय आहे?
तुमचा विषय स्पष्ट सांगा.
उदाहरण:
- १५ ऑगस्ट
- गणेशोत्सव
- वाढदिवस
- रक्तदान शिबिर
- वृक्षारोपण
- कार्यक्रमाचे निमंत्रण
- अभिनंदन
उदाहरण:
विषय: वृक्षारोपण कार्यक्रम३. कोणासाठी आहे?
तुमचा मजकूर कोण वाचणार आहे हे सांगितल्यास ChatGPT ला भाषा आणि शैली निवडणं सोपं होतं.
उदाहरण:
हा संदेश सामान्य नागरिकांसाठी लिहा.किंवा:
हा WhatsApp संदेश माझ्या मित्रांसाठी लिहा.४. भाषा कशी हवी?
तुम्हाला कोणत्या भाषेत आणि कोणत्या पद्धतीने मजकूर हवा आहे ते सांगा.
उदाहरण:
भाषा: साधी आणि शुद्ध मराठी.किंवा:
भाषा: अगदी सोपी मराठी. अवघड शब्द वापरू नका.ही सूचना विशेषतः मराठीमध्ये काम करताना उपयोगी ठरते.
५. शैली किंवा Tone कसा हवा?
एकाच विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने मजकूर लिहिता येतो.
उदाहरण:
- आपुलकीचा
- प्रेरणादायी
- साधा
- व्यावसायिक
- गंभीर
- आधुनिक
- उत्साही
उदाहरण:
टोन: आपुलकीचा आणि मनापासून वाटणारा.किंवा:
टोन: प्रेरणादायी पण अतिशयोक्ती नसलेला.६. किती मोठं हवं?
तुम्हाला किती शब्दांचा मजकूर हवा आहे हेही सांगू शकता.
उदाहरण:
८० ते १०० शब्दांची पोस्ट लिहा.किंवा:
२ मिनिटांचं भाषण लिहा.AI Image तयार करताना आकार सांगायचा असेल तर:
Aspect Ratio: 4:5किंवा:
Aspect Ratio: 9:16असं लिहू शकता.
७. काही विशेष सूचना आहेत का?
शेवटी काही अतिरिक्त सूचना असतील तर त्या देखील लिहा.
उदाहरण:
Emoji वापरू नका.किंवा:
इंग्रजी शब्द शक्यतो वापरू नका.Image तयार करताना:
High Quality.
No Watermark.
Modern Design.
Elegant Marathi Typography.अशा सूचना देता येतात.
एक सोपा Prompt Formula
हे सगळं लक्षात ठेवणं कठीण वाटत असेल तर फक्त हा Formula लक्षात ठेवा:
काय तयार करायचं?
विषय
कोणासाठी?
भाषा
शैली
आकार
विशेष सूचना
उदाहरण:
Facebook साठी पोस्ट लिहा.
विषय: १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन
कोणासाठी: सामान्य नागरिक
भाषा: साधी आणि शुद्ध मराठी
टोन: प्रेरणादायी
लांबी: ८० ते १०० शब्द
विशेष सूचना: Emoji वापरू नका.हेच Prompt थोडं बदलून तुम्ही वेगवेगळ्या विषयांसाठी पुन्हा वापरू शकता.
आता हा Formula प्रत्यक्ष वापरून पाहूया.
१. वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश
एखाद्या मित्राचा, सहकाऱ्याचा किंवा ओळखीच्या व्यक्तीचा वाढदिवस असेल आणि नेहमीपेक्षा थोडा वेगळा शुभेच्छा संदेश लिहायचा असेल, तर ChatGPT ची मदत घेता येते.
फक्त "वाढदिवसाच्या शुभेच्छा" एवढं लिहिण्याऐवजी तुम्हाला कसा संदेश हवा आहे हे ChatGPT ला सांगा.
हा Prompt कॉपी करा
माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त WhatsApp वर पाठवण्यासाठी
७० शब्दांचा शुभेच्छा संदेश लिहा.
भाषा: साधी आणि आपुलकीची मराठी
टोन: मनापासून आणि सकारात्मक
संदेशामध्ये उत्तम आरोग्य, आनंद आणि यशासाठी शुभेच्छा द्या.
Emoji वापरू नका.स्वतःच्या गरजेनुसार बदल
"मित्राच्या" ऐवजी तुम्ही लिहू शकता:
माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त...किंवा:
माझ्या सहकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त...किंवा:
एका सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त...फक्त एक-दोन शब्द बदलून तुम्ही पूर्णपणे वेगळा संदेश तयार करू शकता.
२. १५ ऑगस्टसाठी शुभेच्छा संदेश
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी किंवा महाराष्ट्र दिन यांसारख्या दिवसांसाठी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना ChatGPT चा उपयोग करता येतो.
हा Prompt कॉपी करा
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त Facebook साठी
८० ते १०० शब्दांची पोस्ट लिहा.
भाषा: साधी आणि शुद्ध मराठी
टोन: प्रेरणादायी आणि सकारात्मक
स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा थोडक्यात उल्लेख करा.
शेवटी सर्वांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा द्या.
Emoji वापरू नका.स्वतःच्या गरजेनुसार बदल
ही पोस्ट तुम्ही तुमच्या संस्था, व्यवसाय किंवा वैयक्तिक Facebook Profile साठी वापरणार असाल तर Prompt मध्ये ते स्पष्ट सांगू शकता.
उदाहरण:
ही पोस्ट आमच्या संस्थेच्या वतीने लिहा.किंवा:
ही पोस्ट माझ्या वैयक्तिक Facebook Profile साठी लिहा.यामुळे ChatGPT त्यानुसार भाषेची शैली बदलू शकतो.
३. अभिनंदन संदेश
एखाद्या व्यक्तीने परीक्षेत यश मिळवलं, पुरस्कार मिळवला, एखादी स्पर्धा जिंकली किंवा एखादं महत्त्वाचं काम पूर्ण केलं असेल, तर त्यांच्यासाठी अभिनंदन संदेश तयार करण्यासाठीही ChatGPT उपयोगी ठरतो.
हा Prompt कॉपी करा
एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या महत्त्वपूर्ण यशाबद्दल
अभिनंदन करणारी Facebook पोस्ट लिहा.
भाषा: साधी मराठी
टोन: मनापासून आणि सकारात्मक
पोस्ट ८० शब्दांची असावी.
त्यांच्या मेहनतीचं आणि यशाचं कौतुक करा.
शेवटी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्या.
Emoji वापरू नका.अधिक चांगला Result कसा मिळेल?
यश नेमकं कशात मिळालं हे Prompt मध्ये सांगितलं तर ChatGPT अधिक नेमका संदेश तयार करेल.
उदाहरण:
त्यांनी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.किंवा:
त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आहे.किंवा:
त्यांना सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.माहिती जितकी स्पष्ट, तितका संदेश अधिक वैयक्तिक आणि योग्य होईल.
४. कार्यक्रमाचे निमंत्रण
सभा, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी निमंत्रण तयार करायचं असेल तर ChatGPT तुमचं काम सोपं करू शकतो.
हा Prompt कॉपी करा
खालील माहितीच्या आधारे WhatsApp वर पाठवण्यासाठी
साधं आणि आकर्षक कार्यक्रमाचं निमंत्रण तयार करा.
कार्यक्रम: आरोग्य तपासणी शिबिर
तारीख: २० ऑगस्ट
वेळ: सकाळी ९ ते दुपारी २
ठिकाण: श्री गणेश मंदिर सभागृह
भाषा: साधी मराठी
टोन: आपुलकीचा
शेवटी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं
आवाहन करा.
Emoji वापरू नका.स्वतःच्या कार्यक्रमासाठी माहिती बदला
या Prompt मध्ये तुम्हाला फक्त कार्यक्रमाची माहिती बदलायची आहे.
उदाहरण:
- कार्यक्रमाचं नाव
- तारीख
- वेळ
- ठिकाण
- प्रमुख पाहुणे
- आयोजक
- संपर्क क्रमांक
उदाहरणार्थ, रक्तदान शिबिरासाठी फक्त:
कार्यक्रम: रक्तदान शिबिरअसं बदललं तरी तुम्ही नवीन Prompt तयार करू शकता.
या चार उदाहरणांमधून काय लक्षात आलं?
आपण प्रत्येक Prompt मध्ये ChatGPT ला फक्त विषय सांगितलेला नाही.
आपण त्याला सांगितलं आहे:
काय तयार करायचं?
विषय काय आहे?
कोणासाठी आहे?
भाषा कशी हवी?
टोन कसा हवा?
किती मोठं हवं?
काही विशेष सूचना आहेत का?
ही माहिती दिल्यामुळे ChatGPT ला आपल्याला नेमकं काय हवं आहे हे समजायला मदत होते.
आता याच पद्धतीने आपण काही अधिक practical Prompt पाहूया.
५. रक्तदान शिबिराची Facebook पोस्ट
एखाद्या सामाजिक उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Facebook पोस्ट लिहायची असेल, तर ChatGPT काही सेकंदांत त्याचा मसुदा तयार करू शकतो.
हा Prompt कॉपी करा
रक्तदान शिबिराबद्दल Facebook साठी १०० शब्दांची माहितीपूर्ण पोस्ट लिहा.
कार्यक्रमाचे ठिकाण: शिवाजी पार्क मैदान, दादर
तारीख: २५ ऑगस्ट
वेळ: सकाळी ९ ते दुपारी २
भाषा: साधी मराठी
टोन: आपुलकीचा आणि प्रेरणादायी
नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करा.
पोस्टमध्ये कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि ठिकाण स्पष्टपणे नमूद करा.
Emoji वापरू नका.AI Image तयार करण्यासाठी Prompt कसा लिहायचा?
ChatGPT चा वापर फक्त मजकूर लिहिण्यासाठीच होतो असं नाही.
योग्य सूचना दिल्यास ChatGPT च्या मदतीने सोशल मीडियासाठी विविध प्रकारचे AI Images, Posters आणि Banners तयार करता येतात.
विशेषतः वाढदिवस, अभिनंदन, शुभेच्छा, कार्यक्रम किंवा जनसंपर्कासाठी आकर्षक पोस्टर तयार करायचं असेल तर Image Prompt खूप उपयोगी ठरतो.
Text Prompt मध्ये आपण शब्द, भाषा आणि टोन यावर जास्त लक्ष देतो.
पण Image Prompt मध्ये दृश्य कसं दिसावं हे सांगणं महत्त्वाचं असतं.
उदाहरणार्थ:
- Background कसा हवा?
- व्यक्ती कशी दिसावी?
- Lighting कशी असावी?
- कोणते रंग वापरायचे?
- Design कसं असावं?
- Text कुठे असावा?
- फोटोसाठी जागा हवी का?
- Poster चा आकार काय असावा?
आता हे प्रत्यक्ष उदाहरणातून पाहूया.
९. नेत्याचा Heroic Birthday Banner
एखाद्या नेत्याचा किंवा सामाजिक कार्यकर्त्याचा वाढदिवस असेल, तर नेहमीच्या साध्या शुभेच्छा पोस्टरऐवजी Heroic आणि Premium Look असलेला Banner तयार करता येतो.
जर तुमच्याकडे त्या व्यक्तीचा चांगला Portrait Photo असेल, तर तो Image Generation मध्ये reference म्हणून वापरता येतो.
हा Prompt कॉपी करा
Create a premium and heroic birthday social media poster using the uploaded portrait photo.
Subject:
The person should look confident, dignified and approachable.
Composition:
Powerful half-body portrait with a slightly low camera angle.
Keep the face natural and recognizable.
Lighting:
Dramatic cinematic lighting with subtle highlights and rim light around the subject.
Background:
Premium dark cinematic background with subtle golden light rays and soft depth.
Style:
Heroic
Premium
Modern
Cinematic
Realistic
High-end political campaign design aesthetic
Add elegant Marathi typography:
"वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा"
Leave clean space for the person's name and designation.
Keep the design balanced and uncluttered.
Aspect Ratio: 4:5
High Resolution.
No watermark.हा Prompt का चांगला आहे?
आपण फक्त "वाढदिवसाचा Poster तयार करा" असं सांगितलेलं नाही.
आपण व्यक्ती कशी दिसावी, Camera Angle, Lighting, Background, Style, Text आणि Poster Size हे सगळं स्पष्ट सांगितलं आहे.
यामुळे AI ला अपेक्षित Design समजण्यास मदत होते.
१०. अभिनंदनासाठी Premium Poster
एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला, निवड झाली किंवा एखादं महत्त्वाचं यश मिळालं असेल, तर त्यासाठी आकर्षक अभिनंदन Poster तयार करता येतो.
हा Prompt कॉपी करा
Create a premium congratulatory social media poster using the uploaded portrait photo.
Subject:
Confident and dignified portrait of the person.
Background:
Elegant dark blue and golden gradient with subtle light effects.
Style:
Premium
Professional
Modern
Elegant
Cinematic
Composition:
Place the person's portrait prominently on one side.
Keep enough clean space for Marathi text on the other side.
Marathi Text:
"मनःपूर्वक
अभिनंदन!"
Below the main text, leave space for the person's name and achievement.
Use elegant Marathi typography.
Do not overcrowd the design.
Aspect Ratio: 4:5
High Quality.
No watermark.स्वतःच्या गरजेनुसार बदल
"मनःपूर्वक अभिनंदन!" ऐवजी तुम्ही तुमच्या गरजेनुसार मजकूर बदलू शकता.
उदाहरण:
"हार्दिक अभिनंदन!"किंवा:
"यशाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा!"तसंच Background चे रंगही बदलू शकता.
११. मोठ्या सभेसाठी कार्यक्रम Poster
मोठी सभा, मेळावा किंवा सार्वजनिक कार्यक्रम असेल तर फक्त व्यक्तीचा फोटो वापरण्याऐवजी मोठ्या कार्यक्रमाचा माहोल दिसणारा Poster तयार करता येतो.
हा Prompt कॉपी करा
Create a cinematic and premium political public meeting poster.
Main Subject:
Use the uploaded portrait photo of the leader as the main subject.
Keep the person's face natural and recognizable.
Scene:
Large public gathering with a crowd in the background.
People should appear enthusiastic but realistic.
Composition:
Place the leader prominently in the foreground.
Create depth between the leader and the crowd.
Lighting:
Dramatic evening lighting with subtle golden highlights.
Background:
Large outdoor public meeting atmosphere with stage lights and a realistic crowd.
Style:
Cinematic
Realistic
Powerful
Premium
Professional campaign creative
Leave clean space for Marathi event details.
Add elegant Marathi typography:
"जाहीर सभा"
Leave additional space for:
Date
Time
Location
Aspect Ratio: 4:5
High Resolution.
No watermark.लक्षात ठेवा
AI Image तयार केल्यानंतर कार्यक्रमाची तारीख, वेळ, ठिकाण आणि इतर महत्त्वाची माहिती डिझाइनमध्ये नंतर Canva किंवा इतर design tool मध्ये टाकणं अधिक सोयीचं ठरू शकतं.
१२. जनसंपर्कासाठी Heroic Creative
नेता किंवा सामाजिक कार्यकर्ता लोकांमध्ये फिरत असलेला, नागरिकांशी संवाद साधत असलेला फोटो वापरूनही आकर्षक Creative तयार करता येतो.
हा Prompt कॉपी करा
Create a premium cinematic social media campaign poster using the uploaded photo.
Scene:
The person is interacting naturally with local citizens during a public outreach activity.
Composition:
Show the main person prominently in the foreground.
Include a small group of people in the background.
Expression:
Confident, friendly and approachable.
Lighting:
Warm natural evening light with subtle cinematic highlights.
Background:
Realistic Indian urban neighborhood atmosphere.
Style:
Documentary photography
Cinematic
Realistic
Premium
Natural
Professional
Keep the person's face and identity natural.
Do not change facial features.
Leave clean negative space for Marathi text.
Aspect Ratio: 4:5
High Resolution.
No watermark.हा Prompt कुठे उपयोगी पडेल?
अशा प्रकारचा Creative:
- जनसंपर्क
- नागरिक भेट
- पदयात्रा
- सामाजिक उपक्रम
- स्थानिक कार्यक्रम
- भेटीगाठी
यासाठी वापरता येतो.
Image Prompt मध्ये एक महत्त्वाची गोष्ट
Text Prompt मध्ये आपण "काय लिहायचं?" यावर लक्ष देतो.
Image Prompt मध्ये आपण "काय दिसायला हवं?" यावर लक्ष देतो.
म्हणून Image Prompt लिहिताना ही माहिती लक्षात ठेवा:
Subject + Composition + Background + Lighting + Style + Text + Aspect Ratio
ही माहिती स्पष्ट दिली तर AI ला तुमच्या कल्पनेनुसार Image तयार करण्यासाठी अधिक चांगल्या सूचना मिळतात.
१३. १५ ऑगस्टसाठी विशेष Social Media Creative
राष्ट्रीय दिवसांसाठी नेत्याचा किंवा सामाजिक कार्यकर्त्याचा फोटो वापरून एक आकर्षक Creative तयार करता येतो.
फक्त तिरंगा Background लावण्यापेक्षा त्यात Patriotic Mood, Cinematic Lighting आणि Premium Composition दिल्यास Design अधिक प्रभावी दिसू शकतो.
हा Prompt कॉपी करा
Create a premium patriotic social media poster for India's Independence Day using the uploaded portrait photo.
Subject:
Use the uploaded portrait as the main subject.
Keep the person's face natural and recognizable.
Composition:
Place the person prominently in the foreground.
Use a confident and dignified pose.
Background:
Indian Independence Day theme with the Indian tricolour,
subtle saffron, white and green light effects,
a soft Ashoka Chakra in the background,
and a cinematic patriotic atmosphere.
Lighting:
Warm cinematic lighting with subtle highlights around the subject.
Style:
Premium
Patriotic
Cinematic
Realistic
Modern
Professional
Add elegant Marathi typography:
"स्वातंत्र्य दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा"
Keep enough clean space for the person's name and designation.
Do not overcrowd the design.
Aspect Ratio: 4:5
High Resolution.
No watermark.एक उपयोगी सूचना
अशा राष्ट्रीय दिवसांच्या Creative मध्ये तिरंगा, Ashoka Chakra किंवा इतर राष्ट्रीय चिन्हांचा वापर करताना Design सन्मानपूर्वक आणि योग्य पद्धतीने ठेवणं महत्त्वाचं आहे.
तुम्हाला फक्त Background तयार करून त्यावर नंतर मजकूर टाकायचा असेल तर Prompt मध्ये असं लिहू शकता:
Do not add any text.
Leave clean negative space for text to be added later.१४. गणेशोत्सवासाठी शुभेच्छा Poster
सणांच्या काळात Social Media वर शुभेच्छा देण्यासाठी आकर्षक Poster तयार करण्यासाठीही AI Image Prompt वापरता येतो.
उदाहरणार्थ, गणेशोत्सवासाठी व्यक्तीचा फोटो आणि गणपतीच्या सजावटीचं सुंदर दृश्य एकत्र करता येतं.
हा Prompt कॉपी करा
Create a premium and elegant Ganesh festival greeting poster using the uploaded portrait photo.
Subject:
Use the uploaded portrait naturally.
Keep the person's face recognizable and realistic.
Scene:
A beautifully decorated traditional Maharashtrian Ganesh festival setup.
Include a tasteful Ganesh idol in the background,
traditional flowers, mango leaves, warm diyas and subtle festive decorations.
Composition:
Place the person on one side and keep enough clean space for Marathi greeting text.
Lighting:
Warm golden evening lighting with soft highlights and realistic shadows.
Style:
Traditional Maharashtrian
Elegant
Premium
Cinematic
Realistic
Festive
Add elegant Marathi typography:
"गणेशोत्सवाच्या
हार्दिक शुभेच्छा"
Keep the overall design clean and respectful.
Aspect Ratio: 4:5
High Resolution.
No watermark.याच Prompt मध्ये काय बदलू शकता?
याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या सणांसाठी Creative तयार करू शकता.
उदाहरण:
Replace the Ganesh festival theme with Diwali.किंवा:
Replace the Ganesh festival theme with Makar Sankranti.म्हणजे प्रत्येक सणासाठी नवीन Prompt सुरुवातीपासून लिहिण्याची गरज नाही.
१५. निवडणूक किंवा जनसंपर्कासाठी Campaign Creative
एखाद्या नेत्याचा किंवा उमेदवाराचा फोटो वापरून Campaign Creative तयार करायचा असेल, तर AI ला फक्त "Political Poster तयार कर" असं सांगण्यापेक्षा व्यक्ती, वातावरण, Composition आणि Design Style स्पष्ट सांगणं चांगलं.
हा Prompt कॉपी करा
Create a powerful and premium political campaign social media creative using the uploaded portrait photo.
Subject:
Use the uploaded portrait as the main subject.
Keep the person's face natural, realistic and recognizable.
Pose:
Confident standing pose with a positive and approachable expression.
Background:
Large realistic public gathering with citizens in the background.
Create a sense of public connection and community participation.
Composition:
Place the main subject prominently in the foreground.
Create depth between the subject and the background crowd.
Lighting:
Dramatic cinematic lighting with subtle golden highlights.
Style:
Premium
Cinematic
Realistic
Powerful
Professional
Modern campaign design
Use a clean and sophisticated colour palette.
Leave substantial negative space for Marathi campaign text.
Do not overcrowd the design with too many elements.
Aspect Ratio: 4:5
High Resolution.
No watermark.एक महत्त्वाची गोष्ट
AI ने तयार केलेल्या Campaign Creative मध्ये नाव, तारीख, ठिकाण, निवडणूक चिन्ह किंवा इतर महत्त्वाची माहिती नंतर Canva सारख्या Design Tool मध्ये टाकणं अनेकदा अधिक सोयीचं असतं.
यामुळे प्रत्येक माहितीवर तुमचं पूर्ण नियंत्रण राहतं आणि नंतर छोटा बदल करायचा असेल तरी पूर्ण Image पुन्हा तयार करण्याची गरज पडत नाही.
१५ Prompt पूर्ण झाले!
आता आपण या लेखामध्ये एकूण १५ practical Prompt पाहिले.
यापैकी:
Text Prompt:
- वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश
- १५ ऑगस्टची Facebook Post
- अभिनंदन संदेश
- कार्यक्रमाचे निमंत्रण
- रक्तदान शिबिराची पोस्ट
- वृक्षारोपण कार्यक्रमाची पोस्ट
- WhatsApp संदेश
- छोटं भाषण
AI Image Prompt:
- Heroic Birthday Banner
- अभिनंदन Poster
- मोठ्या सभेचा Poster
- जनसंपर्क Creative
- १५ ऑगस्ट Creative
- गणेशोत्सव शुभेच्छा Poster
- Campaign Creative
म्हणजे ChatGPT किंवा AI Image Tool वापरताना फक्त "मला एक पोस्ट बनवून दे" एवढंच सांगण्याची गरज नाही.
तुम्हाला नेमकं काय हवं आहे, ते थोडं स्पष्टपणे सांगितलं की Result अधिक चांगला मिळू शकतो.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे...
पहिल्याच प्रयत्नात Perfect Result मिळाला नाही तरी Prompt पुन्हा बदलता येतो.
पहिल्याच प्रयत्नात योग्य Result आला नाही तर?
कधी कधी आपण चांगला Prompt दिला तरी पहिल्याच प्रयत्नात आपल्याला हवा तसा Result मिळत नाही.
याचा अर्थ Prompt चुकीचा आहे किंवा ChatGPT चांगलं काम करत नाही असं नाही.
फक्त त्याला अजून थोड्या सूचना द्यायच्या असतात.
उदाहरणार्थ, तुम्ही वाढदिवसाचा Poster तयार केला आणि तो खूप साधा वाटला.
तर नवीन Prompt सुरुवातीपासून लिहिण्याची गरज नाही.
त्याच ChatGPT conversation मध्ये तुम्ही लिहू शकता:
हा Poster आणखी Premium आणि Heroic करा.
Background अधिक cinematic ठेवा.
व्यक्तीचा फोटो मोठा करा.
चेहरा नैसर्गिक ठेवा.
Text साठी अधिक clean space ठेवा.
Design जास्त गर्दीचा वाटू नये.ChatGPT तुमच्या आधीच्या सूचनेचा संदर्भ घेऊन त्यात बदल करण्याचा प्रयत्न करेल.
म्हणून एकाच Prompt मध्ये सगळं Perfect असण्याची गरज नाही.
Result पाहा आणि मग त्यात बदल सांगत जा.
Aesthetic, Signature आणि Trending Style Prompts
Prompt लिहिताना फक्त माहितीच नाही, तर style सुद्धा स्पष्ट सांगितली तर Result खूप बदलतो. Google वर लोक अनेकदा aesthetic prompt for ChatGPT, signature prompt for ChatGPT, best prompt for ChatGPT किंवा gangster-style prompt असे searches करतात. खाली काही practical examples दिले आहेत.
१. Aesthetic AI Image Prompt
हा Prompt कॉपी करा
Create an aesthetic social media poster for a Marathi motivational quote.
Style:
Minimal
Clean
Premium
Soft cinematic lighting
Modern pastel colour palette
Subject:
Keep the quote as the main focus.
Layout:
Plenty of negative space
Elegant typography area
Balanced composition
Language:
Leave space for Marathi text.
Aspect Ratio: 4:5
High Resolution
No watermarkस्वतःच्या गरजेनुसार बदल: Quote चा विषय, colour palette, background mood आणि aspect ratio बदलू शकता.
२. Signature Style Prompt
हा Prompt कॉपी करा
Create a premium greeting poster with a stylish signature look.
Design Style:
Luxury
Elegant
Refined
Clean background
Golden accent highlights
Composition:
Main subject on one side
Leave clean space at the bottom for a signature-style name
Typography Feel:
Sophisticated
Personal
Premium branding look
Language:
Design should support Marathi text.
Aspect Ratio: 4:5
High Resolutionस्वतःच्या गरजेनुसार बदल: Signature name, greeting type, accent colour आणि background texture बदलून वापरा.
३. Gangster-Style / Powerful Character Prompt
हा Prompt कॉपी करा
Create a bold and powerful character-style poster using the uploaded portrait photo.
Style:
Dramatic
High contrast
Dark cinematic background
Strong shadows
Confident and fearless look
Composition:
Close-up portrait
Heroic framing
Text space at the top and bottom
Mood:
Powerful
Intense
Mass appeal
Stylized but realistic face
Aspect Ratio: 4:5
High Resolution
No watermarkस्वतःच्या गरजेनुसार बदल: "gangster" ऐवजी bold, heroic, mass, intense, cinematic असे words वापरून tone safer आणि context-specific बनवा.
४. Best Prompt Pattern for ChatGPT
हा Prompt कॉपी करा
You are an expert Marathi content and design assistant.
I want you to create [what to create].
Topic: [topic]
Audience: [who it is for]
Language: Simple Marathi
Tone: [friendly / premium / emotional / powerful]
Style: [aesthetic / signature / cinematic / minimal]
Length or Size: [word count or aspect ratio]
Special Instructions: [emoji नको / watermark नको / text space ठेवा]
Give me the best possible result in one clean version.स्वतःच्या गरजेनुसार बदल: या template मध्ये bracket मधील words बदलले की तोच Prompt अनेक वेगवेगळ्या कामांसाठी वापरता येतो.
Prompt सुधारण्याचा सोपा मार्ग
समजा तुम्ही एक Image तयार केली.
पण त्यामध्ये:
- Background आवडला नाही
- फोटो खूप छोटा आहे
- रंग जास्त आहेत
- Text साठी जागा कमी आहे
- Design साधं वाटत आहे
तर प्रत्येक वेळी पूर्ण Prompt बदलण्याची गरज नाही.
फक्त नेमका बदल सांगा.
उदाहरण:
Background अधिक premium आणि dark करा.
व्यक्तीचा फोटो मोठा करा.
Text साठी वरच्या बाजूला अधिक जागा ठेवा.
Design अधिक cinematic करा.किंवा:
या Design मध्ये खूप elements आहेत.
Design minimal आणि clean करा.
मुख्य व्यक्तीवर अधिक लक्ष केंद्रित करा.ही पद्धत वापरल्यास AI सोबत काम करणं अधिक सोपं होतं.
Prompt लिहिताना या चुका टाळा
चांगला Prompt लिहिणं महत्त्वाचं आहेच, पण काही चुका टाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
१. खूपच छोटा Prompt देऊ नका
उदाहरण:
Birthday Poster बनव.याऐवजी:
एका सामाजिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त Premium आणि Heroic Social Media Poster तयार करा.
Uploaded portrait photo वापरा.
Dark cinematic background ठेवा.
Golden lighting वापरा.
मराठीमध्ये "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" हा मजकूर ठेवा.
Aspect Ratio 4:5 ठेवा.असा Prompt अधिक स्पष्ट आहे.
२. एकाच Prompt मध्ये विरोधी सूचना देऊ नका
उदाहरणार्थ:
Design खूप साधा ठेवा पण खूप सारे elements वापरा.
Background dark ठेवा आणि खूप bright ठेवा.अशा सूचना AI साठी गोंधळात टाकणाऱ्या ठरू शकतात.
तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते स्पष्ट सांगा.
३. महत्त्वाची माहिती तपासा
ChatGPT ने तयार केलेला मजकूर किंवा AI ने तयार केलेली Image तशीच वापरण्यापूर्वी एकदा तपासा.
विशेषतः:
- नाव
- तारीख
- वेळ
- ठिकाण
- फोन नंबर
- कार्यक्रमाची माहिती
- आकडेवारी
या गोष्टी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करा.
AI तुमच्यासाठी काम सोपं करू शकतो, पण अंतिम तपासणी तुमची जबाबदारी आहे.
एकच Prompt पुन्हा पुन्हा वापरता येतो
एकदा एखादा Prompt चांगला तयार झाला की तो जतन करून ठेवता येतो.
उदाहरणार्थ, तुम्ही वाढदिवसाच्या Poster साठी एक चांगला Prompt तयार केला.
पुढच्या वेळी फक्त:
- व्यक्तीचा फोटो बदला
- नाव बदला
- शुभेच्छांचा मजकूर बदला
- रंग किंवा Background बदला
आणि तोच Prompt पुन्हा वापरा.
असं केल्यामुळे प्रत्येक वेळी सुरुवातीपासून विचार करण्याची गरज पडत नाही.
AI वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा
ChatGPT किंवा कोणतंही AI Tool तुमचं काम सोपं करू शकतं.
ते तुम्हाला:
- कल्पना देऊ शकतं
- मजकूर लिहून देऊ शकतं
- Prompt तयार करून देऊ शकतं
- Image तयार करण्यात मदत करू शकतं
- वेगवेगळे पर्याय सुचवू शकतं
पण तुमचा अनुभव, स्थानिक माहिती, तुमची भाषा आणि तुमचा विचार AI पेक्षा महत्त्वाचा आहे.
म्हणून AI ने तयार केलेला मजकूर किंवा Design तसाच वापरण्यापेक्षा त्यात तुमचा स्वतःचा स्पर्श द्या.
आता स्वतः करून पाहा
आजपासून ChatGPT वापरताना एक छोटा प्रयोग करा.
पुढच्या वेळी फक्त:
Facebook पोस्ट लिहा.असं न लिहिता त्याऐवजी:
Facebook साठी १०० शब्दांची पोस्ट लिहा.
विषय: नागरिकांसाठी आयोजित केलेला सामाजिक उपक्रम
कोणासाठी: सामान्य नागरिक
भाषा: साधी मराठी
टोन: आपुलकीचा आणि सकारात्मक
Emoji वापरू नका.असं लिहून पाहा.
दोन्ही Result मध्ये तुम्हाला फरक जाणवेल.
हळूहळू तुम्हाला कोणत्या प्रकारची सूचना दिल्यावर चांगला Result मिळतो हे स्वतःच समजू लागेल.
तुमचे स्वतःचे Prompt तयार करा
आता पुढे तुम्ही ChatGPT ला कोणतंही काम देताना स्वतःला फक्त हे प्रश्न विचारा:
मला काय तयार करायचं आहे?
विषय काय आहे?
हे कोणासाठी आहे?
भाषा कशी हवी?
शैली कशी हवी?
किती मोठं किंवा कोणत्या आकारात हवं?
काही विशेष सूचना आहेत का?
या प्रश्नांची उत्तरं तुमच्या Prompt मध्ये दिली की सुरुवात करण्यासाठी ते पुरेसं आहे.
आधीचा लेख वाचला आहे का?
या लेखात आपण Prompt कसा लिहायचा आणि त्याचा वापर करून Facebook Post, WhatsApp Message, भाषण आणि AI Images कसे तयार करता येतात हे पाहिलं.
जर तुम्हाला ChatGPT वापरून Facebook Post, Instagram Poster आणि AI Images प्रत्यक्ष कसे तयार करायचे हे पाहायचं असेल, तर आमचा आधीचा लेख नक्की वाचा:
ChatGPT वापरून Facebook पोस्ट, पोस्टर आणि AI Images कसे तयार करावे?
या लेखातील Prompt चा उपयोग करून त्या लेखात सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष पोस्ट आणि Creative तयार करून पाहू शकता.
आणखी Practical AI Prompts हवेत?
या लेखातील Prompt तुम्ही स्वतः तयार करून वापरू शकता.
पण प्रत्येक वेळी नवीन Prompt विचार करण्यापेक्षा तयार आणि practical Prompt चा संग्रह जवळ असेल तर काम आणखी सोपं होतं.
यासाठी आम्ही तयार केली आहे:
कार्यकर्त्याची AI डायरी
मराठी AI Prompts असलेली ही ई-बुक विशेषतः रोजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल कामात AI चा उपयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी तयार केली आहे.
यामध्ये तुम्हाला विविध कामांसाठी तयार Prompt मिळतील, जे तुम्ही Copy करून तुमच्या गरजेनुसार बदलू शकता.
ई-बुकची किंमत: ₹125
कार्यकर्त्याची AI डायरी पाहा आणि खरेदी करा →
AI शिकण्यासाठी तुम्हाला Technical Expert असण्याची गरज नाही.
फक्त योग्य प्रश्न विचारायला आणि योग्य Prompt लिहायला सुरुवात करा.
AI तुमच्यासाठी काम करण्यापेक्षा, AI कडून काम करून घेण्याची कला शिका.
