AI

AI ने राजकीय संदेश कसे लिहायचे

ChatGPT सारख्या साधनांनी मराठीत साधे, खरे संदेश कसे बनवायचे.

Social Sanvad१ मिनिटं वाचा

AI हा नवा साथीदार आहे — जर व्यवस्थित वापरला तर.

AI काय करू शकतो

  • पहिला मसुदा लिहिणं
  • अवघड भाषा सोपी करणं
  • कल्पना देणं
  • वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळा मजकूर

AI काय करू शकत नाही

  • तुमचा अनुभव
  • गावातला / भागातला संदर्भ
  • खरं भावना
  • जबाबदारी

म्हणून AI मदतनीस आहे. तुमच्या जागी नाही.

चांगला प्रॉम्प्ट कसा लिहायचा

खराब:

निवडणुकीसाठी पोस्ट लिहा

चांगला:

तू अनुभवी मराठी राजकीय संवाद सल्लागार आहेस.
ग्रामीण मतदारांसाठी ८० शब्दांचा WhatsApp संदेश लिहा.
विषय: पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली.
टोन: प्रामाणिक, साधा, गर्विष्ठ नसलेला.
इंग्रजी शब्द टाळ.

पाठवण्याआधी विचारा

  1. हा संदेश माझ्या आवाजात वाटतो का?
  2. गोष्टी बरोबर आहेत का?
  3. कोणाची भावना दुखेल का?
  4. मी स्वतः हे बोलू शकतो का?

सोपा सल्ला

AI वापरा. पण फक्त AI वर अवलंबून राहू नका. तुमची भाषा आणि अनुभव — तीच खरी ताकद.

आठवड्यातून एक छोटी टिप

कामाची गोष्ट — थेट तुमच्या WhatsApp वर.

WhatsApp वर जोडा

बटण दाबा → मेसेज पाठवा → अपडेट्स मिळवा

WhatsApp